लॉस अँजेल्स
लॉस अँजेल्स : अमेरीकेच्या संयूक्त संस्थानांपैकी कॅलिफोर्निया राज्यातील लोकसंख्येने पहिल्या क्रमांकाचे आणि देशातील द्वितीय क्रमांकाचे (१९८२) शहर व पॅसिफिक महासागरावरील प्रमुख बंदर. लोकसंख्या शहर ३२, ५९, ३४० (१९८४ अंदाज); महानगरी ९४,७७,९२६ (१९८० जनगणना). राज्यातील ते पहिल्या प्रतीचे औद्योगिक, वित्तीय, व्यापारी व पर्यटनकेंद्र समजले जाते.